कन्नड चित्रपट अभिनेता पुनीत यांचा जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर पुनीतला बेंगळुरूच्या विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याला वाचवता आले नाही. पुनीत आपल्या आईप्रमाणेच धर्मादाय कार्यात गुंतत असे. यासाठी त्याने नेत्रदान करण्याचा संकल्प केला होता. तो त्याच्या मृत्यूनंतर पूर्ण झाला. पुनीतचे डोळे नारायण नेत्रालय आय हॉस्पिटलला दान करण्यात आले. पुनीतचे वडील अभिनेते राजकुमार यांनीही नेत्रदान केले होते.पुनीत राजकुमारच्या नेत्रदानामुळे 3 पुरुष आणि 1 स्त्रीला दृष्टी मिळविण्यात मदत झाली आहे.


