महाराष्ट्राबाहेर शिवसेनेला मिळाली महिला खासदार

0
61

दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात शिवसेनेने स्व. खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिली होती.तर भाजपकडून महेश गावित आणि काँग्रेसकडून महेश धोदी यांनां उमेदवारी देण्यात आली होती. मात्र या निवडणुकीत कलाबेन यांचा विजय झाला असून, त्यांना 1 लाख 16 हजार 834 मते मिळाली आहे. तर भाजपला 66 हजार 157 मतांवर तर काँग्रेसला 50 हजार 677 मतांवर समाधान मानावे लागले.

काही दिवसांपुर्वी अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली होती. त्यामुळे दादरा-नगर हवेली येथे पोटनिवडणूक पार पडली होती. यामध्ये भाजप आणि शिवसेनेने चांगली कंबर कसली होती. शिवसेनेने आपला उमेदवार म्हणून स्व. मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना घोषित केले होते. तर भाजपने महेश गावित यांना उमेदवारी दिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here