हिंगोली येथील विनीत मुरलीधर मुंदडा याने नीट परिक्षेत 720 पैकी 702 गुण मिळविले आहे.देशात पहिल्या शंभरामध्ये येणारा विनीत हिंगोलीचा पहिलाच विद्यार्थी आहे. तर देशात 60 वा क्रमांक मिळविला आहे.
हिंगोली येथील विनीत मुंदडा यांचे प्राथमिक शिक्षण हिंगोलीतच पूर्ण झाले. बहिण राधिका मुंदडा बीडएसचे शिक्षण घेत असल्याने त्यालाही वैद्यकिय शिक्षणाची आवड निर्माण झाली. त्यासाठी इयत्ता सातवी पासूनच तयारी सुरु केली. दररोज किमान 12 ते 15 तास अभ्यास केला.कार्डीयॉलॉजीमध्ये उच्च शिक्षण घेऊन जिल्ह्यातील हृदय रुग्णांची सेवा करण्याचा मानस त्याने बोलून दाखविला आहे.


