महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विशेष पीएमएलए न्यायालयाने 19 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.ईडीने बेनामी संपत्ती प्रकरणी अनिल देशमुख यांना आणखी 9 दिवसांची ईडी कोठडी देण्याची मागणी केली होती. यावर अनिल देशमुखांच्या आणि ईडीच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात 12 तासांहून अधिक काळ चौकशी केल्यानंतर ईडीने देशमुख यांना 1 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा अटक केली. त्यांचा मुलगा हृषिकेश देशमुख याला ५ नोव्हेंबरला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, मात्र ते सलग तिसऱ्यांदा ईडीसमोर हजर झाला नाही. त्याआधारे ईडी अनिल देशमुख यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करू शकते.