सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 51 हजार 534 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 112 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी 4 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजचे कोरोनमुक्त रुग्ण 14 आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असलेले रुग्ण 14 ,व्हेंटीलेटरवर 3 रुग्ण असून 0 मृत्यू झाले आहेत.
राज्यात 24 तासांत 1,094 रुग्णांची कोरोनावर मात केली असून गेल्या 24 तासांत 1,976 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 24 तासांत 17 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून रिकव्हरी रेट 97.64 टक्क्यांवर आला आहे.आणि मृत्यू दर 2.12 टक्क्यांवर आला आहे


