वास्को- गोव्याच्या चिकलिम मधील तरुण शेतकयांनी आपल्या शेतीत नवीन प्रयोग करत तब्बल ६४ पोती भात मिळविले आहे.चिकलिम युथ फार्मर्स क्लब या गटाने एकूण १४००० squm शेतात ज्योती आणि कर्जत या जातीच्या भाताची लागवड केली.भाताच्या कापणीनंतर त्यांना एकूण ६४ पोती भाताचे उत्पन्न मिळाले. प्रत्येक पोत हे २५ किलोचे असून त्यातील ज्योती भाताची ६४ पोती आणि कर्जत भाताची १४ पोती भात मिळाले.
भात कापनीचे काम नागाव येथील शेतकरी जरग फर्नांडिस यांनी केले तर सेंट जोसेफ कॉलेजच्या आठ शिक्षकांनी या युवकांना मदत केली.त्याशिवाय या तरुण मुलाना गोव्याचे शेतकरी यांच्याकडूनही भात लावणीसाठी मदत मिळाली होती.
चिकलिम चर्चचे फादर बॉल्मक्स पररिया यांनी हा क्लब बनविला असून त्यातील सभासदांना मार्गदर्शन केले. या क्लबमध्ये एकूण ३५ सभासद असून त्यातील काही शिकत आहेत तर काही नोकऱ्या करीत आहे.त्याशिवाय अनेक नागरिकांनी त्यांना जमेल तशी आणि जमेल त्यावेळी भाताच्या शेतीसाठी मदत केली.या शेतीसाठी एकूण १ लाख रुपये खर्च आला तर जो आम्ही सर्व सदस्यांनी मिळून केला.आमच्या या शेतीतील भरघोस उत्पन्नाचा आढावा घेण्यासाठी हरयाणातील बासमती तांदुळाचे उत्पन्न घेणारे शेतकरी आणि भारतीय कृषी संशोधनाच्या सदस्यांनी या भातशेतीच्या ठिकाणी बघण्यासाठी आले.या टीमने पुढल्या भाताच्या पेरणीदरम्यान साहाय्य करू असे सांगितले आहे.आलेले भाताचे उत्पन्न या सदस्यांनी वाटून घेतले असून उरलेले भाताचे उत्पन्न विक्रीसाठी ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले,