मराठी वेबसाइट झी 24 तासने सूत्रांच्या हवाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तुर्तास डिस्चार्ज नाही असे सांगितले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मानेच्या त्रासाने अनेक दिवस त्रस्त होते. त्यामुळे 2 आठवड्यापूर्वी त्यांच्या पाठीच्या मणक्याची सर्जरी झाली होती.त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. पण मुख्यमंत्र्यांना लगेच हॉस्पिटलमधून घरी जाण्याची परवानगी डॉक्टरांनी दिली नाही. डॉक्टरांनी त्यांना आणखी आरामाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तुर्तास मुख्यमंत्र्यांना डिस्चार्ज नाही.