राज ठाकरेंनी भेटीचे निमंत्रण दिल्यानतंर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आज दादर येथील राज ठाकरेंच्या नवे घरी जाऊनशिवतीर्थ येथे भेट दिली. यावेळी राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस हे घराच्या बाल्कनीत अत्यंत अनौपचारिक चर्चा करताना दिसल्याचे सांगण्यात येत आहे. दोन दिग्गजांमधील या बैठकीला भाजपकडून केवळ शिष्टाचाराचा दर्जा दिला जात आहे. मात्र पुढील वर्षी होणाऱ्या बीएमसी निवडणुकीतभाजप-मनसे युती होणार? चर्चा रंगली आहे.
BMC ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असून यंदाचे बजेट सुमारे 39 हजार कोटी आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये महापालिका निवडणूक होणार आहे. गेल्या तीन दशकांपासून बीएमसीवर शिवसेनेची सत्ता आहे. मात्र 2017 च्या बीएमसी निवडणुकीत भाजपने 82 जागा जिंकून शिवसेनेला मोठा धक्का दिला होता. शिवसेनेला 84 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर मनसेच्या सातपैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
मनसेची भूमिका एकेकाळी उत्तर भारतीय आणि भाजपविरोधी राहिली आहे. मात्र 2020 मध्ये राज ठाकरेंनी मराठी माणसांपेक्षा हिंदुत्वाचा मुद्दा स्वीकारून आपल्या पक्षाचा झेंडा भगवा केला आहे. एवढंच नाही तर पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी त्यांनी मोदी सरकारचे समर्थन देखील केले होते.