ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुण्यातील रुबी हॉल क्लिनीकमध्ये दाखल

0
114

अण्णा हजारे यांना छातीत वेदना सुरू झाल्यानंतर त्यांना गुरुवारी सकाळी तातडीनं पुण्यात हलवण्यात आलं. अण्णांची एन्जॉग्राफी करण्यात आली असून त्यांना विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याची माहिती मिळाली आहे. अण्णा हजारे यांच्या प्रकृतीबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी विचारपूस केली आहे.मुख्यमंत्री सद्या एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर फिजिओथेरपी सुरू आहे. मात्र आज अण्णा हजारे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कळल्यावर त्यांनी अण्णांच्या प्रकृतीला आराम मिळावा अशी भावना व्यक्त केली.

अण्णा हजारे यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. अण्णांना छातीत वेदना सुरू झाल्यामुळे त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांनी डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आलं आहे. अण्णा हजारे यांच्या ह्रदयासंबधी समस्या उत्पन्न झाल्यामुळे त्यांच्यावर एंजीओग्राफीसह आणखी काही तपासण्या करण्यात आल्या. त्यांच्या ह्रदयात छोटे ब्लॉकेज आढळून आले आहेत. सुदैवानं अण्णांवर कोणतीही शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही. औषधोपचाराने ब्लॉकेज ठीक करण्यात येणार असल्याचं रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख डॉ. परवेझ ग्रांट यांनी माहिती दिली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here