कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत चालला आहे.बाजारपेठ उघडू लागल्या आहेत.सरकारने कोरोनाचे निर्बंधही सैलावले आहेत.शाळा कॉलेजपण सुरु झाल्या आहेत .पण गेल्या 30 दिवसांत 10 मोठ्या राज्यांमध्ये 2400 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक1700 विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत. ज्या विद्यार्थ्यांना संसर्ग झाला आहे. बहुतेक विद्यार्थी लग्न समारंभात हजर राहिले होते. तर कालच कर्नाटकातील धारवाड मेडिकल कॉलेजमधील पार्टीत ६६ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आले होते.आज आणखीन १८२ विद्यार्थी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याने चिंता अधिकच वाढली आहे. विशेष म्हणजे सर्वांचे पूर्णपणे लसीकरण झाले होते म्हणजेच दोन्ही डोस घेतले होते.


