शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक अपार्टमेंट येथील घरी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांची भेट

0
133

शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक अपार्टमेंट येथील घरी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांची भेट  घेतली.ममता मंगळवारी सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. त्या रुग्णालयात दाखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटणार होत्या, मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही. मुंबईत येण्यापूर्वी ममता दिल्लीत होत्या. त्यावेळी काँग्रेस नेते कीर्ती आझाद, हरियाणाचे माजी काँग्रेस प्रमुख अशोक तंवर, जेडीयूचे माजी राज्यसभा खासदार पवन वर्मा यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला होता.

मंगळवारी ममता यांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांचीही भेट घेतली. या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्ही त्यांचे मुंबईत स्वागत करतो. ही मैत्री आम्हाला पुढे न्यायची आहे. ममता यांनी मुंबईतील वायबी चव्हाण हॉलमध्ये नागरी समाजातील लोकांची भेट घेतली. येथे त्या म्हणाल्या- सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आले तर भारतीय जनता पक्षाचा सहज पराभव होऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here