‘मिर्झापूर मध्ये मुन्ना भैय्याचा मित्र ललितची भूमिका साकारणारा अभिनेता ब्रह्मा मिश्रा याचे निधन झाले आहे. 29 नोव्हेंबर रोजी छातीत दुखू लागल्याने डॉक्टरांनी त्याला अपचनाचे औषध देऊन घरी पाठवले. मात्र घरीच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याची प्राणज्योत मालवली.
मुळचा भोपाळ रायसेनचा असलेला ब्रह्मा मिश्रा 32 वर्षांचा होता. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 30 नोव्हेंबरला ब्रह्माचा 32 वा वाढदिवस होता. रायसेनमध्येच त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले होते. त्याचे वडील भूमी विकास बँकेत कामाला होते. मिर्झापूरशिवाय ब्रह्माने केसरी, हसीन दिलरुबा, मांझी, बद्रीनाथ की दुल्हनिया या चित्रपटांमध्येही काम केले होते.ब्रह्माने 2013 मध्ये ‘चोर चोर सुपर चोर’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. 2021 मध्ये आलेला तापसी पन्नू स्टारर ‘हसीन दिलरुबा’ हा त्याचा शेवटचा चित्रपट होता.
ब्रह्मा मिश्राचा मृतदेह तीन दिवस घरातील बाथरूममध्ये पडून होता. सध्या मुंबईतील पोलीस त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करत असून त्यानंतर त्याची मृत्यूची नेमकी वेळ आणि कारण कळू शकेल. 29 नोव्हेंबर रोजी छातीत दुखू लागल्याने डॉक्टरांनी त्याला अपचनाचे औषध देऊन घरी पाठवले. मात्र घरीच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याची प्राणज्योत मालवली. त्याचा फोन 29 तारखेपासून बंद होता. 2 दिवस फोन चालू न झाल्याने भाऊ संदीपने त्याचा FTII चा मित्र आकाश सिन्हा याला घरी पाठवले त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. आकाश ब्रह्माच्या घरी पोहोचला तेव्हा तेथून दुर्गंधी येत होती आणि मृतदेह कुजत होता. त्यामुळे ब्रह्माचे अंतिम संस्कार आता शुक्रवारी सकाळी मुंबईतच करण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.