मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर मानेच्या दुखण्यासाठी मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेसाठी ते 10 नोव्हेंबरला रुग्णालयात दाखल झाले होते आणि 12 नोव्हेंबर रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती पण डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्यास परवानगी दिली नव्हती. आज गुरुवारी तब्बल 22 दिवसांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घरी सोडण्यात आले.
रिलायन्स रुग्णालयाचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया केली होती. गुरुवारी केलेल्या सर्व तपासण्यांच्या अहवालानंतर उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज देण्यात आला. तब्बल 22 दिवस मुख्यमंत्र्यांनी राज्याचा कारभार रुग्णालयातूनच सांभाळला. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुढील काही दिवस मुख्यमंत्र्यांना घरूनच काम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.