अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन 14 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार असल्याचे वृत्त आहे. त्याआधी त्यांच्या काही लग्नविधींना सुरुवात झाली आहे. या विधींचे फोटो दोघांनीही सोशल मीडियावर टाकले आहेत त्यातून अंकिता आणि विकी यांच्या मराठमोळ्या लग्नविधींचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
किता आणि विकी मराठमोळ्या पद्धतीने लग्न करणार आहेत. या लग्नविधींसाठी अंकिताने पैठणी साडी नेसली असून आणि तिने हातात मराठमोळ्या पद्धतीचा हिरवा चुडा भरलाआहे. अंकिताचा हा मराठमोळा लूक लक्षवेधी ठरत आहे. तर विकीने कुर्ता घातला आहे.अंकिताने तिच्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “पवित्र”. विकी आणि अंकिताच्या या फोटोंवर चित्रपटसृष्टीतील सर्वाँनी तसेच चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.


