94 साहित्य संम्मेलनात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

0
87

नाशिकमध्ये आज 94 साहित्य संम्मेलनाचा शेवटचा दिवस आहे.त्यासाठीलोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर उपस्थितीत होते.त्यावेळी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केल्याची घटना घडली आहे.पोलिस सध्या कुबेरांवर शाईफेक करण्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे.

ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावरून वाद सुरू होता.छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिहिल्याने लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली आहे.या पुस्तकात छत्रपती संभाजीराजे यांची बदनामी करण्यात आला असल्याचा आरोप याआधीच संभाजी ब्रिगेडने केला होता. या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी करण्यात येत होती.संभाजी ब्रिगेडचे नाशिक जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील यांनी पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक, चुकीची माहिती लिहिल्याबद्दल शाईफेक करण्यात आल्याचे समर्थन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here