दिल्ली, मुंबई, कर्नाटकातील अनेक जणांचे अहवाल सीक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले आहे. डोंबिवलीतील मर्चेंट नेवीचे अभियंता यांचा अहवाल ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे. हा राज्यातील पहिला रुग्ण आहे. नुकतेच मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत ओमायक्रॉनचे 17 संशयित रुग्ण असल्याची माहिती मिळत आहे.
पिंपरी चिंचवड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या 7 जणांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. 7 जणांपैकी 4 जण नुकतेच परदेशातून परतले होते. या सर्वांची चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये ते पॉझिटिव्ह आढळले. यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या 3 जणांचीही चाचणी करण्यात आली. तिघेही कोरोना पॉझिटिव्ह आढळले. या सर्वांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले असून, त्यांचा अहवाल रविवारी आला. या अहवालात या सर्वांना ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्याचे सांगण्यात आले आहे. पुण्यातील आळंदी येथे एका व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाली आहे जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी सांगितले.
‘हाय रिस्क’ देश वगळता इतर देशांतील प्रवाशांना विमानतळाबाहेर जाण्याची परवानगी असेल. त्यांना 14 दिवस सेल्फ मॉनिटरिंग करावे लागेल. ज्या देशांना ओमायक्रॉनच्या धोक्याच्या श्रेणीतून वगळण्यात आले आहे, तिथून येणाऱ्या प्रवाशांपैकी 5% प्रवाशांची निश्चितपणे चाचणी केली जाईल. जोखीम असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. निकाल लागेपर्यंत प्रवाशांना विमानतळावर थांबावे लागणार आहे. सर्व विमानतळांवर अतिरिक्त RT-PCR सुविधांची व्यवस्था केली जाईल.