‘गगनयान’ मोहीम २०२३ मध्येच होणार !

0
98

भारताची महत्वाकांक्षी समानवी ‘गगनयान’ मोहीम २०२३ मध्येच होणार असल्याचे केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उत्तर देताना सांगितले. या मोहिमेला ‘गगनयान’ हे नाव देण्यात आले आहे. त्याआधी गगनयानची तयारी सिद्ध करणा-या दोन मोहिमा होणार आहेत, त्यापैकी एका मोहिमेत एक मानवी रोबोटही पाठवला जाणार आहे.रशिया, अमेरिका आणि चीन या तीन देशांनीच स्वबळावर म्हणजेच स्वत:च्या रॉकेटच्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने अवकाशात अंतराळवीरांना पाठवले आहे. आता चौथा देश म्हणून भारत या पंक्तीत जाण्याचा प्रयत्न करणार आहे. 

गगनयान मोहिमेसाठी अवकाशात जास्त वजन वाहून नेण्याची क्षमता असलेले जीएसएलव्ही एमके-३ हे प्रक्षेपक रॉकेट सज्ज आहे, तर अंतराळवीर ज्या यानातून प्रवास करणार आहेत ते यान क्य्रू मोड्यूलच्या प्रत्यक्ष चाचण्या लवकरच सुरु होणार आहेत. सर्वकाही सुरळीत पार पडले, तर २०२३ अखेरीस भारतीय अंतराळवीर प्रत्यक्ष अवकाशात पोहोचलेले असतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here