आज मुंबईत ४ ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाली असून , पुणे ग्रामीण भागात 1 आणि पिंपरी चिंचवडमध्ये एक नवा रुग्ण आढळला आहे. आज सापडलेल्या 4 नवीन रुग्णांमुळे मुंबईत ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 23 वर गेली आहे .आतापर्यंत राज्यात ओमायक्रॉनच्या एकूण 54 रुग्णांची नोंद, 28 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. संपूर्ण देशात ओमिक्रॉन रुग्णात वाढ झाली असून एकूण 145 वर ओमिक्रॉनबाधितांची संख्या गेली आहे
आरोग्य विभाग आणि सरकारसमोर मोठं संकट उभा राहात आहे.नागरिकांनी शक्यतो विनाकारण बाहेर पडू नये. तोंड आणि नाकावर मास्क लावावा.कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे


