मुंबई: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याचा वाढदिवस आहे. हा वाढदिवस मानवण्यासाठी सलमान खान आपल्या पनवेल येथील फार्महाऊसवर गेला आहे परंतु बर्थ डेच्या आदल्या दिवशीच सलमानवर एक प्रसंग घडला.
संध्याकाळच्यावेळी आपल्या फार्महाऊसच्या घरात सलमान बसला असताना अचानक सापाने येऊन त्याच्या हातावर दंश केला. सर्पदंश होताच सलमानच्या खासगी डॉक्टरांच्या पथकाने कामोठे येथील रुग्णालयात त्याला भरती केले. ही घटना वाऱ्या सारखी सगळीकडे पसरली. मात्र, साप बिनविषारी असल्यामुळे सलमान या संकटातून सुखरुपपणे बाहेर पडला. सलमानला उपचारानंतर हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे.


