भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त हाती आले आहे. सौरव गांगुली यांना कोलकाता येथील वुडलँड्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सौरव गांगुली यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. गांगुली यांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. तरी देखील त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
सौरव गांगुली यांची कोरोना टेस्ट सोमवारी रात्री करण्यात आली होती. आता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सौरव गांगुली यांना कोरोनाची पहिल्यांदा लागण झाली आहे. या आधी गांगुली यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना काही महिन्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.
सौरव गांगुली यांना गेल्या 2 जानेवारी रोजी हार्टअटॅक आला होता. सौरव घरातील जिममध्ये ट्रेडमिल करत असताना त्यांच्या छातीत अचानक वेदना सुरू झाल्या. नंतर त्यांना तातडीने कोलकाता येथील वुडलँड्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर एका महिन्यात दोनदा अँजियोप्लास्टी करण्यात आली होती. दरम्यान, सौरव गांगुलीनंतर त्यांचे थोरले बंधू स्नेहाशीष गांगुली यांच्यावर देखील अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.