अमेरिका: जगभरात करोना कमी होत असतानाच ओमिक्रोन या नव्या कोरोनाच्या व्हेरिएंटचे आगमन झाले आणि सगळं चित्रच बदलून गेला.जगभरात कोरोना महामारीची तिसरी लाट आली आहे. अमेरिकेत कोरोना रूग्ण संख्येचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे.अमेरिकेत एका दिवसात तब्बल १० लाख नागरिक कोरोनाबाधित आढळून आले आहेत .
अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे त्यांचे संपूर्ण लसीकरण होऊन त्यांनी बुस्टर डोस देखील घेतलेला आहे. असे असतानाही त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.
अत्यंत वेगाने पसरणाऱ्या कोरोनाच्या ओमिक्रोन या व्हेरिएंटमुळे सध्या अमेरिकेत विक्रमी संख्येत रूग्ण आढळून येत आहेत. ही संख्या अन्य देशांच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक आहे. चार दिवसांपूर्वी अमेरिकेत ५ लाख ९० हजारांच्या आसपास रूग्ण आढळल्याचे समोर आले होते.अधिकाऱ्यांसोबत वाढत्या कोरोनाबाबत महत्त्वपूर्ण बैठक करणार आहेत


