ओमिक्रोनची दहशत समोर असताना आता कोरोनाचा आणखीन एक व्हेरिएंट फ्रान्समध्ये सापडला आहे.या व्हेरिएंटला अजून नाव देण्यात आले नसून त्याचे शास्त्रीय नाव IHU B.1.640.2 आहे. फ्रान्समध्ये कोरोनाचा नवीन व्हेरिएंट सापडला असून त्याने संसर्गित झालेले १२ रुग्ण फ्रान्समध्ये सापडले आहेत. कोरोनाचा हा प्रकार अधिक संसंर्गजन्य आहे, कोविड-19 च्या डेल्टापेक्षा गंभीर आहे किंवा नाही याची अजून तरी काही माहिती मिळालेली नाही. तरीसुद्धा या विषाणूने चिंता अजूनच वाढली आहे.
या नवीन व्हेरिएंटमध्ये एकूण ४६ म्युटेशन्स दिसून आले आहेत.ओमिक्रोन मध्ये ३२ म्युटेशन्स होते. त्यामुळे तो वेगाने पसरत होता. कोरोना विषाणूच्या प्रोटीन स्पाईक्स जेवढ्या जास्त तेवढा तो विषाणू वेगाने पसरतो.
अमेरिकेसारख्या देशाने ओमिक्रोनचा संसर्ग पसरेल म्हणून आफ्रिकेच्या लोकांना बंदी घातली. पण आता फ्रान्समध्ये नवीन व्हेरिएंट सापडला असूनही कुणीही त्यांच्यावर बंदी घातलेली नाही.गरीब देशांच्या पाठीशी ठामपणे राहणारे खूप कमी असतात.


