सिंधुदुर्ग:जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते विजयदुर्ग ग्रामपंचायतीच्या विकास कामांचे उद्घाटन

0
92

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग ग्रामपंचायतीच्या माध्यामातून करण्यात आलेल्या विकास कामांचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्तेकरण्यात आले. या विकास कामांमध्ये बालोद्यान, सागर किनाऱ्यावरील गॅझेबो, चेंजिंग रुम यांचा समावेश आहे.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसिलदार मारुती कांबळे, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील, पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, गट विकास अधिकारी अरुण चव्हाण, पंचायत समिती सभापती रवी पाळेकर, जिल्हा परिषद सदस्य वर्षा पवार, पंचायत समिती सदस्य शुभा कदम, विजयदुर्ग सरपंच प्रसाद देवधर, उपसरपंच महेश बिडये यांच्यासह विजयदुर्ग ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here