Covid19: मुंबईत 20 हजार 971 नव्या कोरोना रुग्णांची भर!

0
54


मुंबई: ओमिक्रोनच्या वाढत्या संसर्गामुळे सगळीकडेच भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाच्या पहिल्या संक्रमणावेळी लॉकडाऊनमुळे बाहेर मुंबईत आलेल्या कामगारांना आपल्या घरी जाताना अनेक हाल अपेष्टा भोगाव्या लागल्या होत्या. आता ओमिक्रोनच्या वाढत चाललेल्या साथीने मुंबईत लॉकडाऊन होण्याची आशंका सगळ्यांच्याच मनात येत आहे. याच भीतीने परप्रांतीय मजुरांनी रेल्वे स्थानकावर तळ ठोकला आहे. लॉकडाऊनच्या आधी आपापल्या गावात आणि घरापर्यंत पोहोचायला हवे असाच सर्वांचा प्रयत्न दिसत आहे.राज्यात 24 तासांत कोरोनाच्या 40,925 रुग्णांची नोंद झाली असून, 20 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत गुरुवारी 20,181 नव्या कोरोना बाधित सापडले असून चार मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या मुंबईत 91 हजार 731 सक्रीय रुग्ण आहेत, मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 7 लाख 64 हजार 53 झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात मुंबईत 20 हजार 971 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here