रत्नागिरी: मार्लेश्वरची यात्रा रद्द

0
45
मार्लेश्वरची यात्रा रद्द

प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर

संगमेश्वर- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली संगमेश्वर तालुक्यातील श्रीदेव मार्लेश्वर यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे . केवळ धार्मिक विधी व गिरीजा मार्लेश्वर विवाह पारंपरिक पद्धतीने मोजक्याच उपस्थितांमध्ये करण्यात येणार आहे . त्याचबरोबर मार्लेश्वर येथील सर्व दुकाने दि . १३ व १४ जानेवारी रोजी बंद ठेवण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत .


याबाबत देवरुख पोलीस स्थानकात बैठक घेण्यात आली . यावेळी ही माहिती देण्यात आली . कोरोनाचे सर्व नियम पाळून शासनाच्या मार्गदर्शक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची सूचना देण्यात आली आहे . यावेळी मार्लेश्वरचे मानकरी , पुजारी तसेच वाडेश्वरचे मानकरी , श्री गिरजादेवीचे मानकरी काका शेट्ये , बापू शेट्ये , रमाकांत पाटेकर , हिरु शेट्ये , मारुती शिंदे , मिलिंद शेट्ये , संतोष पोटफोडे उपस्थित होते ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here