दिल्ली :गेल्या दोन दिवसातच एम्स दिल्लीचे जवळपास 150 रेसिडेंट डॉक्टर पॉझिटिव्ह आढळले आहेत.दिल्लीत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. 9 जानेवारी रोजी दिल्लीत कोविडचे 22 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले, तर 17 लोकांचा मृत्यू झाला.प्रत्येक चाचणीसाठी येणाऱ्या प्रत्येक 4 नमुन्यांपैकी 1 नमुना पॉझिटिव्ह येत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्यांना आयसोलेट केले जाणार नाही. अशा आरोग्यसेवा कर्मचार्यांनी घट्ट मास्क घालून काम करावे आणि जास्तीत जास्त सोशल डिस्टेंस मेनटे करावे अशा नियमांचे परिपत्रक काढले आहे.रुग्णालयांमध्ये सर्वात वाईट स्थिती दिल्लीच्या एम्समध्ये आहे. सूत्रांनी सांगितले की एम्समध्ये काम करणारे सुमारे 350 निवासी डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह झाले आहेत.सफदरजंग हॉस्पिटलच्या सूत्रांनीही सांगितले की, जवळपास 80-100 डॉक्टर पॉझिटिव्ह आहेत. राममनोहर लोहिया हॉस्पिटलचे देखील 100 पेक्षा जास्त डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह आहेत. तर लोक नायक हॉस्पिटलचे 50-70 आणि लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजचे 150 रेजिडेंट डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह आहेत.


