मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे निधन झाले आहे.मुंबईतील माहिम येथील निवासस्थानी वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रेखा आणि त्यांची बहीण चित्रा या दोघींनी शाळेत असतानाच नृत्याचे आणि गायनाचे प्रशिक्षण घेतले होते.ख्यातनाम नृत्यगुरू पार्वतीकुमार यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय नृत्याचे शिक्षण घेतले. ‘लाखाची गोष्ट’ हा रेखा कामत यांचा पहिला चित्रपट १९५२ मध्ये प्रादेर्शित झाला होता.
रेखा यांनी कुबेराचे धन, गृहदेवता (दुहेरी भूमिका), गंगेत घोडे न्हाले, मी तुळस तुझ्या अंगणी, माझी जमीन हे त्यांचे गाजलेले चित्रपट. नेताजी पालकर चित्रपटात त्यांनी एक लावणी नृत्य तर जगाच्या पाठीवर चित्रपटात बैठकीची लावणीही सादर केली होती.चित्रपट, नाटक, मालिका, जाहिराती अभिनयाच्या या चारही क्षेत्रांत त्यांनी काम केले .


