मराठी अभिनेता जितेंद्र जोशीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत स्वतःला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. जितेंद्रला ताप,खोकला आणि अंगदुखी हि कोरोनाची लक्षणे त्याला जाणवू लागली तेव्हा त्याने घरीच होम कोविड सेल्फ टेस्ट किटने कोरोना चाचणी केली असता त्याची चाचणी पॉझिटीव्ह आली.
जितेंद्रने आपल्या सेल्फ टेस्ट किटमधील पॉझिटीव्ह आलेल्या रिपोर्टचा फोटो शेअर करतच कोरोना झाल्याचे सांगितले. सेल्फ टेस्ट किटवरील चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर जितेंद्रच्या RTPCR चाचणीचा अहवाल अजून येणे बाकी असल्याचेही त्याने सांगितले.”कोरोनाने मला निवडले. अत्यंत त्रासदायक आणि “ताप”दायक असा हा अनुभव आहे. ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि कोरोनाची सगळी लक्षणे असल्याने माझ्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्यावी ही विनंती. माझा आरटीपीसीआर रिपोर्ट्स आल्यावरच मला कोणता कोरोना आहे हे कळेल असेही तो म्हणाला.सर्वांनी काळजी घेऊन राहा तेही त्याने सांगितले.


