मुंबई – गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली मुंबईच्या ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांचे वय आणि कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
लता मंगेशकर ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आल्याचे त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे.त्या गेले दोन वर्ष कुठेही बाहेर गेल्या नाहीत आणि कुणाच्याही संपर्कात आल्या नव्हत्या. त्या पेडर रोड वर उषा मंगेशकर आणि त्यांच्या परिवारासोबत राहत आहेत. त्यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर हेही त्यांच्याबरोबर राहतात त्यांच्या घरात जेवण करणारा माणूस बाहेर जाऊन सामान आणतो त्याला कोरोनाची लागण झाली.त्याच्या संपर्कात दीदी आल्या होत्या.तिथूनच त्यांना कोरोनाची लागण झाली .