मुंबई- लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणारे ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉ. प्रतीत समधानी यांनी बुधवारी एएनआयला सांगितले की, “गायिका लता मंगेशकर अजूनही आयसीयू वॉर्डमध्ये दाखल आहेत, परंतु त्यांच्या प्रकृतीत आता थोडी सुधारणा झाली आहे. त्यांनी पुढे सांगितल्यानुसार, लतावर डॉक्टरांची सर्वोत्कृष्ट टीम उपचार करत आहे. त्या ब-या होत असली तरी त्यांच्या कुटुंबीयांना त्यांना भेटू दिले जात नाहीये. त्यांना कोरोनासोबतच न्यूमोनियाचाही त्रास आहे. त्यामुळे त्यांना पुढील 10-12 दिवस आयसीयूमध्ये ठेवण्यात येणार आहे.
दीदींच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचे त्यांच्या कुमबीयांनीही सांगितले आहे तर गायिका आशा भोसले यांनीही लता दीदीच्या प्रकृतीत सुधारणा असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे


