मुंबई -हवामान खात्याकडून मुंबई आणि कोकण विभागासह उत्तर राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थानातून पार्टीच्या पावसामुळे हवामानात फरक झाला आहे .त्यामुळे पुढील चार दिवसात कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याशिवाय विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात तीन दिवसांपासून किमान तापमानात कमालीची घट झाली. याशिवाय मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील तापमान घटले आहे. त्याआधीही कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे अवकाळी पाऊस झाला.कोकण भागात पाऊसामुळे आंब पिकाला धोका आहे. थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस हजेरी लावू शकतो असा इशारा कडून देण्यात आला आहे.


