प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
संगमेश्वर – संगमेश्वर तालुका काँग्रेसच्या वतीने तालुका अध्यक्ष दत्ताजी परकार यांनी तालुक्यातील स्त्री , पुरुष नेत्यांना , कार्यकर्त्यांना आगामी ग्रामपंचायत , नगर पंचायत देवरुख ,पंचायत समिती , जिल्हा परिषदेच्या निवडणूक लढवायची इच्छा आहे अशा इच्छूक स्त्री , पुरुष ऊमेदवारांनी तालुका काँग्रेसकडे सोमवार दि.3१ जानेवारी 2O22 पर्यंत संगमेश्वर तालुका काँग्रेस अध्यक्ष यांच्या नावे अर्ज करावेत असे आवाहन केले आहे. सदर अर्ज देवरूख येथे संदीप वेल्हाळ सचीव संगमेश्वर तालुका काँग्रेस यांचेकडे जमा करावेत असे आवाहन संगमेश्वर तालुका अध्यक्ष दत्ताजी परकर यांनी केले आहे .
या बाबत स्पष्टीकरण देताना दत्ताजी परकार यांनी सांगितले की अखिल भारतीय काँग्रेस कमेटी , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी आणि रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने गावागावात , शहरात काँग्रेसची डिजीटल सदस्य नोंदणीचे अभियान राबविण्याचे ठरविण्यात आले आहे. यासाठी सदस्य नोंदणी प्रमुख म्हणून इच्छूक ऊमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. इच्छूक ऊमेदवार सदस्य नोंदणी प्रमुख म्हणून नियुक्ती होतील. त्यांची नावे प्रदेश काँग्रेस आणि डायरेक्ट अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे नोंद होणार आहे. त्यामुळे बोगस नोंदणीला आणि मतदार यादी वरून बोगस सदस्य करता येणार नाहीत. तसेच जे इच्छूक ऊमेदवार नोंदणी सदस्य होतील. त्या सर्वांना पक्ष संघटनेतील आणि शासनातील ही महत्वाची पदे दिली जाणार आहेत. तसेच पक्षाच्या वतीने ऊमेदवारी ही दिली जाणार आहे .
तसेच नोंदणी सदस्यांना त्या निमित्ताने ऊमेदवारांना जनतेशी संपर्क करता येणार आहे.यामुळे काँग्रेस पक्ष संघटन मजबूत होइल. त्यामुळे जिल्ह्यात 2८ फेब्रुवारी पर्यंत विक्रमी डिजीटल काँग्रेस सदस्य नोंदणी करायची आहे त्यासाठी रत्नागिरी जिल्हातील सर्व तालुका अध्यक्ष , जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी, सदस्य , सर्व सेलचे पदाधिकारी , महिला , युवक सर्व फ्रंटलच्या सर्व विभागातील सदस्यांनी नोंदणीमध्ये सहभाग घ्यावा तसेच तालुक्यातील नेत्यांनी व कार्यकर्तांनीही उस्फूर्तपणे सहभाग घ्यावा असे आवाहन दत्ताजी परकार यांनी अशोकराव जाधव ऊपाध्यक्ष, प्रवक्ते रत्नागिरी जिल्हा काँग्रेस यांचे आणि राजेश पत्यानी जिल्हा ऊपाध्यक्ष, संदिप वेल्हाळ , बंटी गोताड यांचे ऊपस्थितीत केले आहे


