सिंधुदुर्ग:वेंगुर्ला तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे 9 ठिकाणी कंटेन्मेंट झोन लागू

0
106

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. वेंगुले तालुक्यात ८ ऍक्टिव्ह रुग्ण आज सापडले असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८१ आहे. आतापर्यंत सावंतवाडी आणि कणकवली तालुक्यात कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आले आहेत. तर आजपासून वेंगुर्ला तालुक्यातही 9 ठिकाणी कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आले आहेत.
वेंगुर्ले तालुक्यातील कंटेन्मेंट झोन पुढील प्रमाणे आहेत.
वेंगुर्ला तालुक्यातील मोचेमाड नाबरवाडी येथील घर नंबर 201 चे सभोवतालचा वर्तुळाकार 25 मीटर चा परिसर, रेडी-नागोळे येथेील घर नंबर 67 चे सभोवतालचा वर्तुळाकार 25 मीटर चा परिसर, कांबळेवीर येथील घर नंबर 858 चे सभोवतालचा वर्तुळाकार 25 मीटर चा परिसर दि. 24 जानेवारी 2022 पर्यंत कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

रेडी गावतळे येथील घर नंबर 1124 चे सभोवतालचा वर्तुळाकार 25 मीटर चा परिसर, आवेरा तळेकरवाडी येथील घर नंबर 705 चे सभोवतालचा वर्तुळाकार 25 मीटर चा परिसर, आडेली- खुटवळवाडी, येथील घर नंबर 306 चे सभोवतालचा वर्तुळाकार 25 मीटर चा परिसर, दाभोली-ख्रिश्चनवाडी, येथील घर नंबर 263 चे सभोवतालचा वर्तुळाकार 25 मीटर चा परिसर, दि. 25 जानेवारी 2022 पर्यंत कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

शिरोडा-हरीजनवाडी येथील घर नंबर 159 चे सभोवतालचा वर्तुळाकार 25 मीटर चा परिसर, शिरोडा-हरीजनवाडी येथील घर नंबर 143 चे सभोवतालचा वर्तुळाकार 25 मीटर चा परिसर दि. 26 जानेवारी 2022 पर्यंत कंटेन्मेंट झोन जाहिर करण्यात आले आहेत.

सदर कंटेन्मेंट झोनमध्ये जाहीर करण्यात आलेल्या दिनांकापर्यंत सर्व आस्थपना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच नागरिकांच्या येण्या-जाण्यास व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल, वेंगुर्ला तालुक्यातील व त्यांच्या आजुबाजूचा परिसर व कोरोना बाधीत क्षेत्र म्हणुन घोषित केलेल्या सर्व गावे, वाड्यायामधील सर्व शासकीय कार्यालय,सार्वजनिक ठिकाणे येथे लेखी नोटीस लावून व दवंडी देवून संबंधित,तलाठी,गामसेवक व पोलीस पाटील यांनी प्रसिध्दी द्यावी. स्थलांतरित मजूर, पर्यटक, भाविक,विद्यार्थी व इतर व्यक्तींना त्यांचे वास्तव्यास मुळ ठिकाणी स्थलांतर करण्यास परवानगी दिली असेल तरी कोरोना विषाणू बाधित क्षेत्रातून अशा व्यक्तींना स्थलांतरणास परवानगी राहणार नाही.

सदर आदेश अत्यावश्यक सेवा जसे सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था इ. वितरीत करणारे, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या वाहनांना लागू असणार नाहीत. या आदेशाचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 व 58, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 71,139 आणि भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल असे आदेश प्रशांत पानवेकर, उपविभागीय दंडाधिकारी, सावंतवाडी यांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here