सिंधुदुर्ग-अभिमन्यु वेंगुर्लेकर
वेंगुर्ला- तालुक्यातील वायंगणी बागायतवाडी येथे सिलिंडरचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. या स्फोटात वसंत गणेश फटनाईक (७०) व गणेश वसंत फटनाईक (२९) या बाप लेकांचा जागीच मृत्यू झाला आहे.
वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी बागायतवाडी येथे राहत्या घरात सिलिंडर चा स्फोट होऊन वडील व मुलगा यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. वडील वसंत गणेश फटनाईक व मुलगा गणेश वसंत फटनाईक अशी यांची नावे आहेत.
स्फोटाचा मोठा आवाज आल्याने घराच्या पुढील बाजूस असलेल्या याच घरातील कुटुंबातील व्यक्तींनी तसेच शेजाऱ्यांनी धाव घेतली व आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान घटनास्थळी वेंगुर्ला पोलीस, वेंगुर्ला नगरपरिषद, कुडाळ एम आय डी सी अग्निशमन बंब दाखल झाले व आग विझवण्यात यश आले मात्र आग एवढी भयंकर होती की सर्व जाळून खाक झाले होते. वसंत फटनाईक यांची पत्नी मनिषा वसंत फटनाईक या मासे विक्रीसाठी गेल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. दुपारी उशिरापर्यंत पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा सुरू होता.


