रत्नागिरी-मडगाव गाडी २ फेब्रुवारीपर्यंत रद्द

0
89

कोकण रेल्वेचे विद्युतीकरण वेगात , इलेक्ट्रिक इंजिनची चाचणी पूर्ण

प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर

रत्नागिरी- कोकण रेल्वे मार्गांवरील वेर्णा-कारवार दरम्यान विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू असून, इलेक्ट्रिक इंजिनची दुसरी चाचणी दोन दिवसांपूर्वी घेण्यात आली. हा टप्पा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासन प्रयत्न करत आहे. सध्या याच टप्प्यातील टनेलमधील कामांसाठी रत्नागिरी-मडगाव ही गाडी २ फेब्रुवारीपर्यंत तात्पुरती रद्द केली आहे.


विद्युतीकरणाच्या कामाअंतर्गत रत्नागिरी ते वेर्णा दरम्यानचे काम वेगाने केले जात आहे. ते काम पूर्ण झाल्यावर कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण होईल. गतवर्षी रोहा-रत्नागिरी हा रेल्वे मार्ग विजेवर चालणाऱ्‍या गाड्यांसाठी सज्ज झाला आहे. परंतु जोपर्यंत संपूर्ण मार्ग विद्युतीकरणासाठी सज्ज होत नाही, तोपर्यंत डिझेल इंजिनचा वापर केला जात आहे. सध्या या मार्गांवर मालगाड्या विद्युत इंजिनवर धावत आहेत. रत्नागिरी-वेर्णा दरम्यान मार्गातील टनेलमधील विद्युत यंत्रणा तपासली जात आहे. त्यासाठी रत्नागिरी-मडगाव ही गाडी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी-दादर पॅसेंजर ही पुढे मडगावकडे नेण्यात येते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हे काम पूर्ण होईल, असा अंदाज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here