‘लागिर झालं जी’ या मालिकेतील अभिनेता ज्ञानेश माने यांचा कार अपघातामध्ये मृत्यू

0
25

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय ‘लागिर झालं जी’ या मालिकेतील अभिनेता ज्ञानेश माने यांचा कार अपघातामध्ये मृत्यू झाला आहे.पुण्याजवळील रोटी घाटातून जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला.ज्ञानेश यांच्या मृत्यूमुळे मनोरंजनसृष्टीत दु:ख व्यक्त केले जात आहे.

पुण्यातील रोटी घाटातून प्रवास करत असताना घाटातील वळणावर ज्ञानेश यांच्या कारला भीषण अपघात झाला. अपघातानंतर ज्ञानेश माने हे बेशुद्ध पडले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना तात्काळ ससून रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला. पण रुग्णालयात नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. ज्ञानेश हे पेशाने डॉक्टर होते. त्यांना अभिनयाची प्रचंड आवड असल्यामुळे त्यांनी मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवले होते. त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटात उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. ज्ञानेश माने यांच्या पाश्चात पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे

ज्ञानेश माने यांनी ‘सोलापूर गँगवार’‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’‘अंबुज’ हंबरडा याारख्या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here