मुंबई, ठाणे शिधावाटप यंत्रणेतील सर्व अधिकृत शिधावाटप दुकाने सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहणार

0
61

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे. त्यामुळे गरीब व गरजू शिधापत्रिकाधारक अन्नधान्यापासून वंचित राहू नये म्हणून मुंबई/ठाणे शिधावाटप यंत्रणेतील सर्व अधिकृत शिधावाटप दुकाने सकाळी 8.00 ते रात्री 8.00 यावेळेत सुरु ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. जेणेकरुन अधिकृत शिधावाटप दुकानात एकाचवेळी गर्दी होणार नाही. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) पात्र शिधापत्रिकाधारकांना शिधावस्तूपासून वंचित राहावे लागू नये यासाठी आवश्यक सूचना सर्व उपनियंत्रक शिधावाटप यांचेमार्फत सर्व यंत्रणेला देण्यात आलेल्या आहेत.

यासाठी मुंबई/ठाणे शिधावाटप यंत्रेणतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना त्यांना शासनाकडून देय असलेल्या अन्नधान्याच्या तपशिलाबाबत शासनाच्या http://mahaepos.gov.inया वेबसाईटवरील RC Details मध्ये जाऊन शिधापत्रिकाधारकांना त्यांचे शिधापत्रिकेकरीता देण्यात आलेल्या 12 अंकी SRC Number टाकून खातरजमा करावी. याबाबत तक्रार असल्यास खालील हेल्पलाईन क्रमांक तसेच ई-मेल क्रमांक यावर तक्रार नोंदवावी.

राज्य हेल्पलाईन (सकाळी 10 ते सायं.6)Ø निशुल्क हेल्पलाईन क्रमांक :- 1800 22 4950/1967Ø अन्य हेल्पलाईन क्रमांक :- 022-23720582/23722970/ 23722483Ø ई-मेल क्रमांक :- [email protected]Ø वेबसाईटवरील ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली :- mahafood.gov.inØ वन नेशन-वन रेशन कार्ड संबंधी हेल्पलाईन क्रमांक:- 14445v मुंबई/ठाणे शिधावाटप क्षेत्र नियंत्रण कक्ष (सकाळी 10 ते सायं.6)Ø हेल्पलाईन क्रमांक:- 022-22852814Ø ई-मेल क्रमांक :- [email protected]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here