सिंधुदुर्ग: कणकवलीत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

0
41

सिंधुदुर्ग-प्रतिनिधी पांडुशेठ साठम

हिंदुहृदयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कणकवली येथे जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक व शिवसेना नेते सतिश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली.बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी “अमर रहे अमर रहे बाळासाहेब अमर रहे,” “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो,” अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, महिला जिल्हा संघटक निलम सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, ज्येष्ठ शिवसैनिक अनिल हळदिवे, शेखर राणे, अँड.हर्षद गावडे, राजु राणे, रामु विखाळे, सुनिल पारकर, विलास गुडेकर, सत्यवान राणे, काका राणे, राजन म्हाडगुत, बाळु पारकर, महेश कोदे, दामु सावंत, सिद्धेश राणे, सुदाम तेली, भालचंद्र दळवी, तेजस राणे, दिव्या साळगावकर, रोहिणी पिळणकर, प्रशांत वनस्कर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here