कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा नवा BA-2 सब-व्हेरियंट सापडला आहे.ओमायक्रॉनचा सब-व्हेरियंट BA-2 नाव देण्यात आले आहे.हा व्हेरिएंट इंदूरमध्ये सापडला आहे.16 लोकांना ओमायक्रॉनच्या या नवीन स्ट्रेनची लागण झाल्याचे आढळून आले आहे.देशभरातून 530 नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.कोरोनाच्या BA-2 या नवीन व्हेरिएंटची लक्षणे ओमायक्रॉन सारखीच आहेत. घाबरू नका, परंतु सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. नवीन व्हेरिएंट BA-2 हा ओमायक्रॉन सारखाच संसर्गजन्य आहे. मात्र, ते किती धोकादायक आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही असे संशोधकांनी सांगितले आहे.


