पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.5 वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.8वी ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता मुदतवाढ

0
30

सिंधुदुर्ग

सन 2022 मध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.8वी ची ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता दि.25 जानेवारी 2022 रोजी पर्यंतच सुधारित मुदतवाढ देण्यात येत आहे. तरी शाळेतील जास्ती जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी प्रविष्ठ व्हावे व अर्ज भरण्यसाठी शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक यानी केले .

या परीक्षेकरिता शाळांना माहिती प्रपत्र व ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दि.15जानेवारी 2022 ते दि.31 जानेवारी 2022 या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. काही प्रशासकीय कारणास्तव ही मुदतवाढीत अंशत: बदल करण्यात येत असून त्यानुसार दि 31 जानेवारी ऐवजी दि. 25 जानेवारी 2022 रोजी पर्यंतच सुधारित मुदत देण्यात येत आहे. या परीक्षेकरिता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन अर्ज भरले नसतील त्यांनी दि. 25 जानेवारी 2022 अखेरपर्यंत पूर्ण करावी. ऑनलाईन अर्ज दि.25 जानेवारी 2022 रोजीपर्यंत भरलेल्या शाळांनी,दि. 27 जानेवारी 2022 रोजीपर्यंत शुल्काचा भरणा करता येईल. या बदलाची सर्व संबंधितानी नोंद घ्यावी असे आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 01 यांच्याकडून कळविण्यात आलेले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here