सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज अखेर 53 हजार 343 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.आज 265 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत तर कोरोनाच्या 1 हजार 337 रुग्णांवर उपचार सुरु असून जिल्ह्यात आणखी 62 रुग्णांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली आहे पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असलेले रुग्ण 19,व्हेंटीलेटरवर ४ रुग्ण असून 1 मृत्यू झाले आहेत.


