प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
सिंधुदुर्ग – प्रजासत्ताक दिनांच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ मंगळवार दि. 26 जानेवारी 2022 रोजी पोलीस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे सकाळी 9.15 वा. आयोजित करण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य समारंभ संपन्न होणार आहे.


