प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला विविध क्षेत्रांत अमूल्य योगदान देऊन देशसेवा करणाऱ्या व्यक्तिंना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.या महाराष्ट्रातील दहा जणांचा समावेश आहे. यामध्ये प्रभा अत्रे यांच्याव्यतिरिक्त सीरम समूहाचे संस्थापक सायरस पूनावाला, टाटा उद्योग समूहाचे चेअरमन नटराजन चंद्रशेखरन यांना पद्मभूषण पुरस्कार तर डॉ. हिंमतराव बाविस्कर, डॉ.विजयकुमार डोंगरे, डॉ.भीमसेन सिंघल, दिवंगत डॉ. बालाजी तांबे, ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण, गायक सोनू निगम विज्ञान-अभियांत्रिकी क्षेत्रात अनिलकुमार राजवंशी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. राष्ट्रपतींनी एकूण १२८ पद्म पुरस्कार जाहीर केले आहेत. या ४ पद्मविभूषण, १७ पद्मभूषण आणि १०७ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.


