कोल्हापुर: पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण झाली असून, स्वत: सतेज पाटील यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती यांनी फेसबुकवर एक पोस्ट करत कोरोना झाल्याची माहिती दिली आहे.त्यांनी आपल्या फेसबुकच्या पोस्ट मध्ये “आत्ताच माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी घरीच उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे की त्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.” असे म्हंटले आहे.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपली कोरोनाची चाचणी केली असता त्यात ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यानंतर ते डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे ते उपचार घेत असून, संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी असे आवाहन देखील पाटील यांनी केले आहे.


