ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटाला स्थगिती देण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल

0
91
why I killed Gandhi

‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपट 30 जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींची हत्या केली होती. या चित्रपटाचा ट्रेलर 22 जानेवारीला रिलीज झाला होता. भारतीय युवक काँग्रेसनेही पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका पूर्ण होईपर्यंत ‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) खासदार अमोल कोल्हे या चित्रपटात ‘गोडसें’ची भूमिका साकारत आहेत, जे गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी महाविकास आघाडी मित्रपक्ष शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात तेढ निर्माण करत आहे. सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे ‘गोडसेंनी महात्मा गांधींची हत्या का केली ?का गोडसेंनी हे पाऊल उचलले, याचे कारण या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या प्रश्नावर एक पुस्तकही आहे, जे नथुराम गोडसेंच्या नावाने प्रकाशित झाले आहे.या चित्रपटात भारताची फाळणी आणि पाकिस्तानमध्ये हिंदूंवरील अत्याचारांसाठी महात्मा गांधींना दोषी ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटात भारताचा भूतकाळ आणि 20 व्या शतकाचा इतिहास चित्रपटात अतिशय बारकाईने दाखवण्यात आला आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here