सिंधुदुर्ग : कणकवली पंचायत समिती उपसभापती पदासाठी निवडणूक जाहीर – जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

0
61

सिंधुदुर्ग : कणकवली पंचायत समिती उपसभापती पदासाठी निवडणूक घेण्यात येत आहे .ही निवडणूक घेण्यासाठी दि. 4 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 3 वाजता विशेष सभा बोलावण्यात आली आहे.कणकवली पंचायत समिती उपसभापती यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसभापती पदासाठी ही निवडणूक घेण्यात येत आहे.
या निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी म्हणून तहसिलदार कणकवली यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

उपसभापती पंचायत समिती यांचा कालावधी सध्याचे उपसभापती पद रिक्त झाले नसते तर ज्या कालावधीपर्यंत सदर पद चालू राहिले असते त्या कालावधीकरिता ही निवड करण्यात येणार आहे. कणकवली पंचायत समितीच्या उपसभापती पदाची निवडणूक कलम 75(1) नुसार उपसभापती पद रिक्त झाले नसते तर जेवढ्या मुदतीकरिता ते पद धारण केले असते तेवढ्याच मुदतीकरिता ते पद धारण करील. या कालावधीकरिता उपसभापती पदाची निवड करण्याची असल्याचे, आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here