दापोली- दापोली तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा चंद्रनगर येथे म. गांधी पुण्यतिथी कार्यक्रम ‘ राष्ट्रीय हुतात्मा दिन ‘ म्हणून विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमातील ‘ सर्वधर्मसमभाव ‘ गीताने या कार्यक्रमाची रंगत वाढली.
चंद्रनगर शाळेत या दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शालेय आवाराची स्वच्छता व साफसफाई या निमित्ताने करण्यात आली. शालेय बागही अधिक सुंदर करण्यात आली. म. गांधी पुण्यतिथीच्या प्रमुख कार्यक्रमात राष्ट्रपिता म. गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी म. गांधी यांना अतिप्रिय असलेल्या ‘ वैष्णव जन तो…’ आणि ‘ रघुपती राघव….’ या भजनांचे सामुहिक गायन झाले. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी ‘ सर्वधर्मसमभाव ‘ या विषयावर आधारित छोटे नाटुकले सादर केले. यामध्ये वेदांत पवार, सेजल कोळंबे, आयुर मुलूख, पूर्वा जगदाळे, प्रथम गावडे, सांची शिगवण, निरजा वेदक, विराज मुलूख, सौम्या बैकर आदी बालकलाकारांनी सहभाग घेतला. हुतात्मा दिन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रिमा कोळेकर, अर्चना सावंत, मानसी सावंत, मनोज वेदक, बाबू घाडीगांवकर, शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ आदींनी खूप मेहनत घेतली.