भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यासाठी संजय दत्तला जामीन मिळवून देणारे मानशिंदे उतरले मैदानात

0
79

प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लैकर

सिंधुदुर्ग- शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावर दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाला असून, उद्या मंगळवार (ता.१) दुपारनंतर यावर निर्णय देण्यात येईल, असे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर बी रोटे यांनी सांगितले.सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात नितेश राणेंच्या जामिनावर आज सुनावणी झाली. अभिनेता संजय दत्तला जामीन मिळवून देणारे ज्येष्ठ वकील सतीश मानशिंदे हे त्यांच्या बाजूने मैदानात उतरले आहेत.

सतीश मानशिंदे यांनी संजय दत्तला शस्त्रास्त्र प्रकरणात जामीन मिळवू दिला होता. तसेच, त्याला टाडाच्या आरोपातून सोडवले होते. अभिनेत्री रिया चक्रवर्ती, अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या प्रकरणातही तेच वकील होते. अनेक बॉलीवूड तारेतारकांचे खटले मानेशिंदे यांच्याकडेच असतात. आणि आता नितेश राणे यांच्या खटल्यात ते उभे आहेत.
आज सकाळी ११ वाजल्या पासून जिल्हा न्यायालयात याबाबत सुनावणी सुरू होती. दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपल्यावर न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी याबाबतचा निर्णय मंगळवारी देण्यात येईल असे सांगितले. जामीन का मिळावा? याबाबत न्यायालयात तीन तास सतीश मानशिंदे यांनी बाजू मांडली. “नशीब टाडा रद्द झाला आहे, अन्यथा टाडा सुद्धा लावला असता” अशा प्रकारची नाराजी पोलिसांच्या कारभारावर व्यक्त केली. तर विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी जामीन नाकारण्याची कारणे दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here