प्रतिनिधी:अभिमन्यू वेंगुर्लेकर
रत्नागिरी- कोकण रेल्वे आता लवकर विजेवर धावणार असून, रोहा ते वेरणा या मार्गावरील विद्युतीकरणाचे ८७ टक्के काम पूर्ण झाले आहे. यासाठी सुमारे १ हजार १०० कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे.
विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वेचे २०० कोटी रुपयांची बचत होणार आहे. तर पर्यावरणपूरक इंधनाच्या वापरामुळे प्रदूषण कमी होईल. सध्या पहिल्या टप्प्यात दिवा ते रत्नागिरी मार्गावर पहिली पॅसेंजर धावू लागली आहे.


