मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाल्याची माहिती हाती आली आहे. रमेश देव यांचे चिरंजीव आणि अभिनेते अजिंक्य देव यांनी रमेश देव यांचे हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती दिली.ते 93 वर्षांचे होते.नुकताच 30 जानेवारी रोजी त्यांनी आपला 93 वा वाढदिवस साजरा केला होता.
अनेक दर्जेदार मराठी चित्रपटातून रमेश देव यांनी नायकाच्या भूमिका निभावल्या आहेत.आपल्या देखण्या आणि राजबिंड्या व्यक्तिमत्वाने त्यांनी त्यावेळच्या तरुणाईला भुरळ पडली होती.त्याशिवाय दिग्दर्शन तसेच अनेक टीव्ही मालिका आणि नाटकांची निर्मिती केली आहे.आज हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. हा मराठी चित्रपटसृष्टीसाठी मोठा झटका आहे.त्यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.